मुंबईशिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच  आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. घाना येथील परिषदेत असंवैधानिक सरकार आणि बेकायदेशीरमार्गाने संरक्षित असलेल्या सरकारचे प्रतिनिधीत्व विधानसभा अध्यक्ष करणार आहेत का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईप्रकरणी सुनावणी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी आज ट्वीट करत म्हटले की, न्याय द्यायला विलंब करणे हे स्पष्टपणे न्याय नाकारने आहे. आणि ही बाब फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लागू होत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने महाराष्ट्राला अन्यायकारक वागणूक दिली.
आता चेंडू सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात (न्यायालय म्हणून काम करत आहे) आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष हे उशीर करण्याच्या डावपेचांनी असंवैधानिक सरकारचे संरक्षण करण्यासाठी आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दावा करत असताना अशाप्रकारे असंवैधानिक सरकारचे अशा समर्थन केले जात असल्याचे पाहणे खेदजनक असल्याचेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले. 






विधानसभा अध्यक्ष हे घाना येथील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे सरकार असंवैधानिक आहे आणि बेकायदेशीर मार्गांनी संरक्षित आहे.
यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून, लोकशाही ही भूतकाळातील गोष्ट असल्याचे संकेत देत असल्याचे आदित्य यांनी म्हटले. 


सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये आदेश दिला होतात  विधानसभा अध्यक्ष जलद गतीने न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे. हा न्याय एका पक्षाबद्दल नाही, तर महाराष्ट्राविषयी आहे. त्यामुळे या प्रकरणात उशीर करणे म्हणजे 
घटनेच्या विरोधात असलेल्यांना संरक्षण देणारी बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. 


अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरु असताना राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवडा परदेश दौऱ्यावर आहेत.  घाना या देशात पार पडणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस हजेरी लावणार  आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राहुल नार्वेकर घाना दौऱ्यावर जाणार आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरु असताना अध्यक्ष दौऱ्यावर जाणार आहेत. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत  परिषद होणार आहेत. जगातील विविध देशांतील संसद व विधीमंडळ प्रमुख सामील होणार आहे. जागतिक संसदीय व राजकीय प्रश्नावर  विचारमंथन होणार आहे.