एक्स्प्लोर
'पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे', राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

नाशिक: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. 'स्मारकाच्या माझ्या संकल्पना वेगळ्या असतात, पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे.' अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला. पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अशा 100 फुटी कारंजा आणि बॉटिनिकल गार्डनमधल्या लेझर शोसह इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनीह राज ठाकरेंचं तोंडभरुन कौतूक केलं 'राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं. माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केलं. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील.' असं म्हणत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली. संबंधित बातम्या:
VIDEO: राज जे काही करतो ते पराकोटीचं असतं: नाना पाटेकर
Before You Go
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















