एक्स्प्लोर

Raj Thackeray on Ajit Pawar : माझे कितीही मतभेद असतील, पण अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत : राज ठाकरे

Raj Thackeray on Ajit Pawar : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. 

Raj Thackeray on Ajit Pawar : महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, राज्यांमध्ये संधी उपलब्ध असताना बाहेरच्या मुलांना संधी मिळतात. स्थानिकांना मिळत नाहीत. त्या योग्य वापरल्यास तर आरक्षणाची गरज राहणार नाही असा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. दरम्यान, मराठवाड्यातील दौऱ्याला विरोध झाल्यानंतर तसेच सुपारी फेकण्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना इशारा दिला आहे. जर माझं मोहोळ उठलं, तर तुम्हाला एकही सभा घेता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. 

अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत 

राज ठाकरे यांनी बोलताना अजित पवार (Raj Thackeray on Ajit Pawar) यांच्यासोबत कितीही मतभेद असले तरी ते कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत असं सांगितले. राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून बोलताना जोरदार पण टीका केली. ते म्हणाले की सगळ्या पक्षांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला असताना अजून त्याचा निर्णय का होत नाही? मोदी मागील दहा वर्षे बहुमताने सत्तेत होते, तर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित का केला नाही? मोदी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो म्हणतात, मग पवारांनी मराठा आरक्षणासाठी शब्द का नाही टाकला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. 

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या पाठीमागून यांचं मतांसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की यांनी शांत राहावं नाहीतर माझी मुलं काही करतील हे कळणार सुद्धा नाही. त्यांच्याकडे प्रस्थापित असेले, तरी माझ्याकडे विस्थापित असल्याचा इशारा त्यांनी दिला. कपडे काढून आरशात बघावे लागेल असेही ते म्हणाले. परप्रांतीय मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी तोफ डागली. राज्यातील 60 टक्के रिक्षाचालक परप्रांतीय आहेत. त्यांना राज्य सरकारच्या वतीने परवाना दिला जात आहे. मराठा राज्यातील बहुतांश शैक्षणिक संस्था या मराठा समाजातील नेत्यांच्या आहेत. मग पोरांना शिकून वंचित का राहावं लागत आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget