पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरुन चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. खड्यांविरोधात जनता एकत्र येत नाही आणि जनतेचा राग जोपर्यंत मत पेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजणार नाहीत, असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.
ते म्हणाले की, रस्त्यांवर पडलेले खड्डे हे काही पहिल्यांदा पडलेले नाहीत. मागील अनेक मला निवडून देणाऱ्या लोकांचे आश्चर्य वाटते. जोपर्यंत लोकांच्या मनातील राग मतपेटीतून दिसणार नाही तोपर्यंत खड्डे पडणं बंद होणार नाही. खड्ड्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. खड्ड्यांविरोधात मनसेने राज्यभर आंदोलनं करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरातील आंदोलनाची पद्धत वेगळी असणार आहे.
टाऊन प्लॅनिंगची कोणाला माहितीच नाही!
पुण्यात सात शहरं वसल्याचं ते म्हणाले होते. अजही त्यांनी वाढत्या पुण्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. पुणे शहर कसं आणि कोणत्या दिशेने किती पसरत आहे. याची कोणालाही कल्पना नाही आहे. पुण्यात सध्या फक्त मतदार वाढवण्याचं काम सुरु आहे. शहराच्या टाऊन प्लॅनिंगची कोणालाही काही काळजी दिसत नाही किंवा टाऊन प्लॅनिंग नेमकं काय असतं?, याबाबत कोणाला माहिती असावी याची शंका असल्याचं ते म्हणाले.
प्रत्येक शहराची रचना वेगळी असते. त्या रचनेनुसार आणि लोकसंख्य़ेनुसार शहराच्या गरजा असतात. रुग्णालयं, शाळा, कॉलेज, मार्केट हवं असतं. सोबतच नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होईल, अशी परिसराची रचना असायला हवी. त्यामुळे लोकसंख्या वाढताना प्रत्येकवेळी याचा विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.
वाटेल तेव्हा निवडणुका होणार?
सध्या राज्यात कायदा नावाची गोष्ट उरलेली नाही. निवडणुकांचा कधी होणार हा प्रश्न मागील अनेक महिन्यांपासून उपस्थित केला जात आहे. मनाला वाटेल तेव्हा निवडणुका घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पुण्यात मनसेकडून आंदोलन
राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खड्ड्यांविरोधात आक्रमक झाले होते. त्यांनी शहरातील विविध परिसरातील खड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन छेडलं होतं. रस्त्यावरली खड्यात वृक्षारोपण करा आणि शांततेत आंदोलन करा, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं. त्यानुसार पुण्यात मनसैनिक एकत्र आले होते. पुण्यासह राज्यातील काही शहरांमध्येही अशा प्रकारचं आंदोलन कऱण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :