Pune News : राज ठाकरेंचा आदेश अन् पुण्यातील मनसैनिक झाडं घेऊन रस्त्यावर, खड्ड्यांमध्ये केलं वृक्षारोपण

पुण्यातील मनसैनिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं आहे.

MNS

1/8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आक्रमक झाली आहे.
2/8
मात्र, हे आंदोलन खळ्ळखट्याक पद्धतीने नव्हे तर अभिनव मार्गाने होणार आहे.
3/8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले.
4/8
या आंदोलनामुळे तरी प्रशासन जागे होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटलं.
5/8
त्यांच्या आदेशानुसार आज पुण्यातील विविध परिसरात मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे.
6/8
पुण्यातील विविध परिसरातील खड्ड्यांमध्ये झाडं लावण्यात आली आहेत.
7/8
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबतच मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
8/8
घोषणाबाजी करत सगळ्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण केलं आहे.
Sponsored Links by Taboola