जळगाव : नाशिकसह (Nashik) विभागात लाचखोरी सुरुच असून आता पाच लाख रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या सखाराम कडू ठाकरे या विशेष लेखापरीक्षकाला (Special Auditor) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या या कारवाईने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून लाच स्वीकारणाऱ्या ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जळगाव जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी ही पतसंस्था अवसायानात निघाल्याने सदर संस्थेच्या गाळ्याची अनामत रक्कम नगरपरिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सखाराम कडू ठाकरे (Sakharam Kadu Thackeray) या विशेष लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली असून अँटी करप्शन ब्युरोचे या कारवाईने जळगाव (Dhule) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


यावल तालुक्यातील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी ही पतसंस्था अवसयानात निघाल्याने या संस्थेचे सावदा येथील राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल कार्यालयाच्या गाळ्याची भरलेली सुरक्षित अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी, सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक सखाराम ठाकरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाचोरा येथे जाऊन धुळे येथील सहकारी संस्थेचे विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे याला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली असून, याप्रकरणी सखाराम ठाकरे यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


काही दिवसांपूर्वी लिपिकास अटक 


दरम्यान काही दिवसांपूर्वीच धुळे एसीबीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे यास अडीच हजारांची लाच घेताना अटक करण्यात करण्यात आली होती. यातील तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी यातील संशयित जोंधळे यांनी 2500 रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली. या घटनेला दहा दिवस होत नाहीत तोच लाचेची दुसरी घटना समोर आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Crime : जनतेचे सेवक ना? मग लाच घेताना लाज कशी वाटत नाही, हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर?