नवी मुंबई : मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा आज पक्षाच्या चौदाव्या वर्धापनदिनी करण्यात आली आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. त्यानंतर मनसेच्या शॅडो कॅबिनेटविषयी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, सरकारने चांगलं काम केलं तर आम्ही नक्की कौतुक करु. मात्र घोटाळे किंवा अनियमितता आढळली तर वाभाडे काढू. राज ठाकरेंनी या शॅडो कॅबिनेटला प्रतिरुप मंत्रिमंडळ असं नाव दिलं आहे.

कुणालाही ब्लॅकमेल करु नका

महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजघटकांसाठी काम करणारं हे शॅडो कॅबिनेट आहे. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत, तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करु, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. सरकारच्या कामाची माहिती काढण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करताना कुणालाही ब्लॅकमेल करु नका. माहिती अधिकाराचा चांगला वापर करावा अशा सूचनाही राज ठाकरेंनी सर्वांना दिल्या. शॅडो कॅबिनेटच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात तरी तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला या कामात सहभागी करून घेईन, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर; आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरे नजर ठेवणार

कामं केली तरी लोक मतदान करत नाहीत

मनसेच्या स्थापनेनंतर गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली. मात्र तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही. मनसेकडून लोकांना कामाच्या अपेक्षा आहेत, मात्र मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. मनसेचे चौदा वर्षात अनेक आमदार, नगरसेवक निवडून आले. पक्षाने चौदा वर्षात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र एवढ्या चढ-उतारानंतर देखील तुम्ही सगळे माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला जास्त आनंद आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसैनिकांचे आभार मानले.

काँग्रेस केंद्रात सत्तेत होती, मात्र आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. राजकारणात हे सगळं होत असतं. ज्यावेळी देशात लाट असते, त्यावेळी अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? मात्र चौदा वर्षात माध्यमांनी प्रेम दिलं आणि बोचरी टीकाही केली, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

Shadow Cabinet | शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

मनसेचं प्रतिरुप कॅबिनेट (शॅडो कॅबिनेट)

गृह, विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडेवित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरेमहसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकरऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईलग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे,मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरीशिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्येकामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणेनगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकरसहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमयेअन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधवमत्स्यविकास : परशुराम उपरकरमहिला व बालविकास : शालिनी ठाकरेसार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रेसार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकरसार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्तासांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकरकौशल्य विकास : स्नेहल जाधव