देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज चौदावा वर्धापन दिन, मनसेच्या संभाव्य शॅडो कॅबिनेटची यादी 'एबीपी माझा'च्या हाती, राज ठाकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
2. राज्यातील सरकारी खात्यात 2 लाख 193 पदं रिक्त असल्याची माहिती, गृह, जलसंपदा, कृषी, महसूल विभागात सर्वाधिक पदं रिक्त असल्याचं माहितीच्या अधिकारात समोर
3. महाविकास आघाडी सरकार लवकरच शिक्षकांची मेगाभरती करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं आश्वासन, डी. एड, बी. एड. धारक विद्यार्थ्यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
4. मुंबईच्या आझाद मैदानातील मराठा तरुणांच्या उपोषणाचा आज 42वा दिवस, प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
5. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना तीन दिवसांची ईडी कोठडी, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कारवाई, तर डेबिट कार्डद्वारे खातेदारांना पैसे काढण्याची मुभा
6. भारतात कोरोनाचा आकडा 39वर, महाराष्ट्रात मात्र एकही रुग्ण नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, जगभरात एका लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग
7. कोरोनाचा होळी आणि धुलिवंदनाला फटका, पुरवठा कमी झाल्याने रंग आणि पिचकाऱ्यांच्या किंमती 50 टक्क्यांनी वधारल्या, तर आयोजकांकडून होळीचे कार्यक्रम रद्द
8. पुण्यात कात्रजच्या बोगद्याजवळच्या टेकडीवर वणवा, अनेक झाडं जळून खाक, वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी जीव धोक्यात घालून आग विझवली
9. मुंबईतील सायन उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला, 16 बेअरिंग बसवण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण, सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक पूर्ववत
10. रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्र आणि बंगाल संघ आमनेसामने, राजकोटमध्ये आजपासून सामन्याला सुरुवात होणार, चेतेश्वर पुजाराचा सौराष्ट्र संघात समावेश