एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरे 29 नोव्हेंबरला कोल्हापुरात; मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

राज ठाकरे मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांची मंगळवारी सर्किट हाऊसमध्ये मनसे शहर-जिल्हा कार्यकारणी आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे.

Raj Thackeray Kolhapur Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांची मंगळवारी सर्किट हाऊसमध्ये मनसे शहर-जिल्हा कार्यकारणी आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी ते सावंतवाडीकडे रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी येथे पोहोचतील. कुडाळ येथे मुक्काम असेल. राज ठाकरे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत‌. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील मनसैनिकांना ते काय कानमंत्र देणार? याकडे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरेंकडून निवडणुकीचं भाकित

दरम्यान,राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात लवकरच कोणत्या निवडणुका होणार आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. "मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय," असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील परळमधल्या कामगार मैदानात मनसेतर्फे कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक

दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची आज वांद्रे एमआयजी क्लब इथे बैठक बोलावली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील लोकसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या बैठकीत संवाद साधणार आहे. त्याचसोबत 27 नोव्हेंबरला मुंबईत मनसे गट नेत्यांचा जो मेळावा होणार आहे त्याच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे. मनसेने याआधीच निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget