एक्स्प्लोर
मुख्यमंत्री रतन खत्रीकडे कामाला होते का? : राज ठाकरे
निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून वाटोळं केल्याचंही राज म्हणाले.
सातारा : विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवे आकडे देत आहेत. ते काय रतन खत्रीकडे कामाला होते का?, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले.
मोदींचं हे शेवटचं बजेट आहे. आज तेवढ्या वेळात आपला हिशोब आटोपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले.
निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून वाटोळं केल्याचंही राज म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement