मुंबई : कोरोना व्हायसरचा राज्यात झपाट्याने प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचं, कामाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदनही केलं. सरकारला उपाययोजना करायला थोडा उशीर झाला आहे, मात्र सरकारनं योग्य पावलं उचलल्याचं राज ठाकरे म्हटलं आहे.
पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल फोनवर बोलणं झालं. सद्यस्थितीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांना काही सूचना देखील केल्या आहेत. सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे, मात्र देशांर्तगत विमान सेवा सुरु आहे, ती बंद करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
मूठभर लोकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही
काही मुठभर लोकांना परिस्थिचीचं गंभीर्य कळत नाही. कालच बंद झाला, तो भारत बंद नव्हता, ती एक टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही, तर सरकारला गंभीर आणि कडक पावलं उचलावी लागतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं. सरकारकडून नागरिकांना घरी थांबण्याचं आवाहन करुनही दुसऱ्या दिवशी वाहनं रस्त्यावर आली, चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. असं का करताय असा सवाल राज ठाकरेंनी लोकांना विचारला.
कोरोनाला सहज घेऊ नका
कोरोना व्हायरस देशात जास्त पसरला तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे आहे का? असं राज ठाकरेंनी विचारलं. काल थाळीनाद, घंटानादाला लोक एकत्र बाहेर जमले होते. कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चपर्यंत सरकारने लॉकडाऊन केलं असलं तरी लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते, असा अंदाजही राज ठाकरेंनी वर्तवला.
संबंधित बातम्या
- Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू
- Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची
- coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती
- Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देश