नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर काल (रविवार) रात्री धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं.
ज्यावेळी धाड टाकली गेली, त्यावेळी अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले. धरमपेठ भागात असणाऱ्या या हॉटेलचं नाव ‘रुफ नाईन’ असं आहे.
हा परिसर अतिशय व्हीव्हीआयपी मानला जातो. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच अनधिकृतपणे हॉटेल कुणाच्या आशीर्वादानं उभं राहिलं? हा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.
दरम्यान, या हॉटेलमधील एक पुरुष कर्मचारी आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील रुफटॉप हॉटेलवर छापेमारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Feb 2018 12:05 PM (IST)
मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर काल (रविवार) रात्री धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -