एक्स्प्लोर

संजय राऊतांचा खुलासा समाधानकारक नाही, हक्कभंग झाला इथंपर्यंत पोहचलो - नार्वेकर

Sanjay Raut Privilege Notice : शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे.

Sanjay Raut Privilege Notice : शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेकडून हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत (rajya sabha) जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळं आता राज्यसभेच्या अभिप्रायाकडं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

हक्कभंगाच्या आरोपावर खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या खुलासावर विचार केला. तो मला समाधानकारक वाटत नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नार्वेकर यांनी सभागृहात ही माहिती दिली. त्याशिवाय संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग संदर्भातील प्रकरण उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग संदर्भात 20 मार्च पर्यंत मुदत वाढवून दिली होती. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या खुलासावर मी विचार केला. पण समाधानकारक वाटला नाही. हक्कभंग झाला या निर्णयापर्यंत मी आलो आहे, असे नार्वेकर म्हणाले. 
 
संजय राऊत हक्कभंग प्रकरणासाठी जी समिती गठीत केली आहे त्या समितीवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांचा खुलासा मला समाधानकारक वाटत नाही.  संजय राऊत यांचा हक्कभंग राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती यांच्याकडे पाठवत आहे, असे नार्वेकर म्हणाले. दरम्यान, विधान भवनाच्या पायऱ्यावंर काही घोषणा करतात. त्याचे पडसाद सभागृहात उमटत असतात. माध्यमातून प्रदर्शित केले जातात. सदस्यांच्या वर्तनाबाबात एसोपी १५ दिवसात केली जाईल. याचं उल्लंघन झाल्यास करावयाची तरतुद असेल, असेही नार्वेकर यांनी सांगितले. 

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 

कोल्हापूर दौऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा 'चोर'मंडळ असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. यानंतर संजय राऊता यांच्याविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर  संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता.  त्यासाठी समिती स्थापन करून संजय राऊत यांना नोटिसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीरी माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्यास हरकत नाही. पण माझे विधान नेमके काय होते ते पाहा, असंही राऊतांनी म्हटलं होतं. दरम्यान, संजय राऊतांनी असं वक्तव्य केल्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत टीका केली होती. तसेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी देखील केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
Ravi Rana: पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget