एक्स्प्लोर

काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री : विखे-पाटील

‘विधानपरिषद पोटनिवडणुकीत मतं फुटली हे दुर्दैव आहे. पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री आहे.'

अहमदनगर : विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी तब्बल 209 मतं मिळवत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. पण याचवेळी 9 मतं फुटल्याची माहिती समोर आल्यानं ते नऊ जण नेमके कोण? याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे. याचवेळी विधानसभेचे विरोधी नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसची मतं फुटली नसल्याचा दावा केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा नेमका दावा का? ‘विधानपरिषद पोटनिवडणुकीत मतं फुटली हे दुर्दैव आहे. पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री आहे. मात्र, फुटलेल्या दोन मतदारांनी अगोदरच काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पक्षात असेपर्यंत त्यांनी पक्षाचा आदेश पाळायला हवा होता. या संदर्भात अहवाल आल्यावर त्यांच्यावर पक्षीय स्तरावर कारवाई होईल.’ असा दावा विखे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान पक्षाला दगा देणारे आमदार कोण? याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसाद लाड जिंकले, आघाडीची 9 मतंही फोडली! नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघडपणे जाहीर केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान ‘पदुम’ राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना मतदान करता आलं नाही. तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी मतदान केलं नाही. राज्यात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय वापरण्यात आला होता. विधानपरिषद निवडणूक निकाल
  • प्रसाद लाड (भाजप)- 209 मतं
  • दिलीप माने (काँग्रेस)- 73 मतं
दोन मतं बाद- 2
  • छगन भुजबळ
  • अर्जुन खोतकर
विधानपरिषद निवडणुकीचं गणित
  • एकूण आमदार – 288
  • भुजबळ, अर्जुन खोतकर आणि MIM च्या 2 आमदारांचं मतदान नाही
  • म्हणजेच उरले 284
  • त्यापैकी प्रसाद लाड यांना 209 मतं, तर दिलीप माने यांना 73 मतं मिळाली
  • काँग्रेस (42)-राष्ट्रवादीचं (41) संख्याबळ पाहता, दिलीप माने यांना 83 – 1 (भुजबळ) = 82 मतं अपेक्षित होती
  • मात्र त्यांना 73 मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीची 9 मतं फुटली.
प्रसाद लाड यांचं बलाबल भाजप – 122 शिवसेना – 63 अपक्ष – 7 एकूण – 192 पण आमदारकी रद्द झाल्याने अर्जुन खोतकर यांनी मतदानाचा हक्क गमावला. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची एकूण 191 मतं प्रसाद लाड यांना पडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 209 मतं मिळाली. दिलीप माने यांचं बलाबल काँग्रेस – 42 राष्ट्रवादी – 41 एकूण – 83 राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ तुरुंगात असल्याने त्यांना मतदान करता आलं नाही. मात्र रमेश कदम हे तुरुंगातून मतदानासाठी आले होते. त्यामुळे दिलीप माने यांना किमान 82 मतं मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 73 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 9 मतं फुटली. संबंधित बातम्या : प्रसाद लाड जिंकले, आघाडीची 9 मतंही फोडली! विधानपरिषद पोटनिवडणुकीत युतीच्या प्रसाद लाड यांची बाजी

भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?

संपूर्ण घटनाक्रम : … आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!

विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी

काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: महायुतीने विधान परिषदेची एक जागा खेचली, आता 3 जागांवर आघाडी मिळवली; मविआची 2 जागांवर घोडदौड, आतापर्यंत काय काय घडलं?
महायुतीने विधान परिषदेची एक जागा खेचली, आता 3 जागांवर आघाडी मिळवली; मविआची 2 जागांवर घोडदौड, आतापर्यंत काय काय घडलं?
Arnab Cyclone: बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Embed widget