एक्स्प्लोर

भाजपच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, मुंबईतल्या भाजपच्या बैठकीनंतर राम शिंदे आणि विखेंची प्रतिक्रिया

आजची बैठक सकारात्म झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असतेच, त्यामुळे चर्चेतून नक्की मार्ग निघेल असही ते बोलताना म्हणाले. दरम्यान तक्रारीच्या सुरांवर बोलण्यास राधाकृष्ण विखे यांनी नकार दिला. दरम्यान बैठक सकारात्मक झाली एवढीच प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर दिली आहे.

मुंबई : भाजपमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींची दखल पक्षानं घेत मुंबईत एक बैठक घेतली होती. भाजपची पक्ष कार्यालयातील ही बैठक संपली असून उद्या नगर जिल्ह्यात भाजपची बैठक होणार आहे. यानंतरच विखेंविरोधातील तक्रारीवर निर्णय घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आजची बैठक सकारात्म झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असतेच, त्यामुळे चर्चेतून नक्की मार्ग निघेल असही ते बोलताना म्हणाले. दरम्यान तक्रारीच्या सुरांवर बोलण्यास राधाकृष्ण विखे यांनी नकार दिला. दरम्यान बैठक सकारात्मक झाली एवढीच प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर दिली आहे. भाजपमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींची दखल पक्षानं घेतली आहे. कारण राम शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी आज मुंबईत भाजपची खलबतं सुरु आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठत पार पडली. चंद्राकांत पाटील मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीत पक्षातल्याच काही नेत्यांमुळं पराभव ओढवल्याची तक्रार राम शिंदेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. अप्रत्यक्षपणे त्यांनी आपल्या पराभवासाठी राधाकृष्ण विखे पाटलांना जबाबदार धरलं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड यांची बैठक झाली होती. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाशिक विभागाच्या बैठकीत राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रवर आरोप केले होते. अशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वच पराभूत आमदारांनी विखे यांना लक्ष्य केलं होतं. ''पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला,'' अशी टीकाही भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाहीर आपली खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेटही घेतली होती. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळे पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेकारस्थानामुळेच झाला, असा आरोप खडसेंनी केला होता. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला होता. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कुणी काम केले याची विश्‍लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत, असं खडसे यांनी म्हटलं होतं. संबंधित बातम्या :  निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना जेपी नड्डांचं आश्वासन

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
भिवंडीतील अर्जुनाळीत FDA ची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, कंपनीचा परवानाही केला निलंबित
भिवंडीतील अर्जुनाळीत FDA ची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, कंपनीचा परवानाही केला निलंबित
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget