एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिर्डीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने काँग्रेसची विखे पाटलांना कारणे दाखवा नोटीस
काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिर्डीमधील साकुरी गावात विखे-पाटील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते.
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिर्डीमधील साकुरी गावात विखे-पाटील शिवसेनेचे स्थानिक उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. विखे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी सदाशिव लोखंडे यांच्या समर्थनार्थ भाषण केले. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकादेखील केली.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊत याबाबत म्हणाले की, विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे भाजपमध्ये आले होते तेव्हाच मी राधाकृष्ण विखे यांना शिवसेनेत या असे आवाहन केले होते. विखे शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. आज सकाळपासूनच विखे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात सहभागी झाले असून पुढेही ते लोखंडेंना मदत करतील. लोखंडे यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
VIDEO | विखे-पाटलांकडून शिवसेनेचा उघडपणे प्रचार सुरु | एबीपी माझा
याच प्रचारसभेत जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. राम शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांचा (राधाकृष्ण विखे पाटलांचा) राजीनामा मंजूर झाला आहे. ते कुठं जाणार हे तुम्हाला माहीत आहे. अशोक चव्हाण म्हणत आहेत की, ते विखे पाटलांचं मन वळववण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला विखेंचे पुत्र सुजय विखे म्हणत आहेत की, मी वडिलांना भाजपात आणणार.
VIDEO | राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement