हज यात्रा होण्याची शक्यता कमी, देशातील यात्रेकरुंचे 2480 कोटी केंद्र सरकारकडे जमा
हजचे पहिले विमान 20 जूनला निघणार होते. तर दुसरीकडे सौदी अरेबियाने पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश सारख्या देशांना हजला लोक पाठवू नये, अशी सूचना आधीच दिल्याचे कळते आहे.

नागपूर : हज यात्रेच्या प्रक्रियेला केंद्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्यापासूनच सुरुवात होते. जवळपास सव्वा लाख लोक भारतातून हजला जात असतात. मात्र यावर्षी हज यात्रा होण्याची शक्यता दिसत नाही. पण भारताच्या हज यात्रेकरूंना मात्र अजून यावर कुठलीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. हज यात्रा होणार की नाही हे स्पष्ट करून, यात्रा होणार नसल्यास लोकांनी यात्रेसाठी जमा केलेले पैसे परत करावे, असं पत्र महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दकी यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे.
भारत सरकारने आंतराराष्ट्रीय उड्डाणांबाबतचा निर्णय 30 जूनपर्यंत घेणार असल्याचं ठरवलं आहे. मात्र हजचे पहिले विमान 20 जूनला निघणार होते. तर दुसरीकडे सौदी अरेबियाने पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश सारख्या देशांना हजला लोक पाठवू नये, अशी सूचना आधीच दिल्याचे कळते आहे. पण भारताच्या हज यात्रेकरूंचे काय हा प्रश्न यात्रेसाठी पैशे भरलेल्यांच्या समोर निर्माण झाला आहे. कारण अजून भारत सरकारकडून काहीच स्पष्टता मिळाली नाही.
हज यात्रेसाठी लागणारा खर्च
- हज यात्रेचा प्रत्येकी खर्च 2.50 लाख रुपये आहे. - त्यातील प्रत्येकी आतापर्यंत जमा रुपये 2 लाख रुपये. - एकूण भारतातील यात्रेकरूंची संख्या 1.25 लाखांच्या आसपास. - केंद्र सरकारकडे एकूण जमा रक्कम 2480 कोटी रुपये
महाराष्ट्राचा हजचा कोटा 12 हजार यात्रेकरूंचा आहे. महाराष्ट्र हज समिती अध्यक्ष जमाल सिद्दकी यांनी अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पत्र लिहिले आहे. त्यात यात्रा होणार की नाही यावर स्पष्टता मागितली आहे. तसेच यात्रेकरूंचे पैसे जर यात्रा होणार नसेल तर लवकर काही व्याजासह परत करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या






















