Indian Currency Notes Issue : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाची फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर याप्रकरणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही नेत्यांनी तर नोटांवर फोटो छापण्यासाठी काही पर्यायही सुचवले. याचसंदर्भात राम कदम (Ram Kadam) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे. राम कदम यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 500 रुपयांच्या नोटांचे चार फोटो जोडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या फोटोंवर त्यांनी काही महापुरुषांसोबत पंतप्रधान मोदींचाही (PM Modi) फोटो राम कदम यांनी लावला आहे. 


भाजप आमदार राम कदम यांनी 500 रूपयांच्या नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकत एक ट्वीट केलं आहे. तसंच 'अखंड भारत... नया  भारत... महान  भारत... जय श्रीराम... जय मातादी' असंही ट्वीटमध्ये लिहिलं आहे. 






काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?


"नवीन नोटांवर एका बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला भगवान गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र छापलं जाऊ शकतं.", इंडोनेशियाचं उदाहरण देत अरविंद केजरीवाल यांनी ही मागणी केली होती. तसेच, यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहणार असल्याचंही केजरीवाल म्हणाले होते. ते म्हणाले, "देव-देवतांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल तर अनेक वेळा प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. मी पंतप्रधान (PM Modi) यांना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या चलनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मीचं चित्र छपावं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Currency : इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला? 'हा' रंजक इतिहास माहित आहे काय?