Aurangabad Fire News: सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असतानाच औरंगाबादमध्ये एका घराला आग लागल्याने संसारोपयोगी  साहित्य जळून खाक झाले आहेत. पैठण तालुक्यातिल मुरमा येथील एका घरास बुधवारी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने घरात कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या आगीच्या घटनेत घरातील सर्वच वस्तू जळून अक्षरशः खाक झाल्या आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणच्या मुरमा येथील नाथा पोटफोडे याची घरची परिस्थितीत अत्यंत हालकीची आहे. शेत मजूरी करून ते पत्नी, दोन मुलांसह कुंटूबाचा संसाराचा गाडा हाकलत होते. एका पत्राच्या घरात राहणारे पोटफोडे कुटुंब बुधवारी सकाळी कामानिम्मित घराबाहेर गेले होते. दरम्यान सकाळी अकरा वाजता त्यांच्या घराला अचानक आग लागली. सुरवातीला आगीचे प्रमाण कमी होते. मात्र अचानक आगीने भडका घेतला आणि पाहता-पाहता आगीचं रुद्रावतार पाहायला मिळाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत घरातील सर्वकाही जळून खाक झाले होते. 


होत्याचं नव्हतं झालं...


पोटफोडे यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील धान्य, संसारोपयोगी सर्व साहित्य आणि एक दुचाकीही जळुन खाक झाली आहे. तर पत्नी व लहान मुलाबाळांना दिवाळी सणानिम्मित नाथा पोटफोडे यांनी नुकतेच नवीन कपडे घेऊन ठेवले होते. परंतु आगीत कपडे व पैसेही जळाले आहे. त्यामुळे पोटफोडे कुटुंब आता रस्त्यावर आले आहे. आगीच्या घटनेत संसारचं होत्याचं नव्हतं झाल्याने नाथा पोटफोडे यांना आता पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार आहे. या घटनेनंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांना प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. 


आगीचे कारण अस्पष्ट...


पोटफोडे यांच्या घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य आगीत जळून खाक झाली आहे. मात्र यावेळी सुदैवाने घरातील गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी (Police Inspection) केली. मात्र पोटफोडे यांच्या घराला अचानक आग कशामुळे लागली याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. 


ऐन सणात औरंगाबाद हादरलं! एकाच दिवशी शहरात दोन हत्येच्या घटना; तिसऱ्याचा तपास सुरू