IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 14 Sep 2017 08:08 AM (IST)
नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जाहीर केली. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. 1000 रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. नोटाबंदीनंतर आयकर दात्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ नोटाबंदीनंतर आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाच ऑगस्टपर्यंत दोन कोटी 82 लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी आयकर भरला आहे. हे नोटाबंदीचं यश असल्याचा दावा सरकारने केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 25 टक्के इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांचे प्रमाण 2 कोटी 26 लाख इतके होते. यामध्ये यंदाच्या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदा पाच ऑगस्टपर्यंत एकूण 2 कोटी 82 लाख 92 हजार 955 जणांनी आयकर भरला.पाच लाखांपेक्षा जास्त लोक आयकर विभागाच्या रडारवर
नोटाबंदीनंतर काळ्या पैशांचा छडा लावण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 31 जानेवारीपासून ‘स्वच्छ धन अभियान’ सुरु केलं. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख 92 हजार नागरिकांकडून आर्थिक ताळेबंदाची माहिती मागवण्यात आली. यातील 9 लाख 72 हजार नागरिकांनीच आर्थिक ताळेबंद सादर केला. उर्वरित नागरिकांच्या बँक तपशीलाची झडती आयकर विभागाकडून घेण्यात येत आहे. तर या अभियानाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यापासून सुरु झाला. या टप्प्यानंतर 5 लाख 56 हजार जणांच्या आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, यातील 1 लाख 4 हजार खातेदार हे ‘स्वच्छ धन अभियाना’च्या पहिल्या टप्प्यातील असल्याचं समोर येत आहे. ज्यांना खात्यातील जमा रक्कमेविषयी माहिती देता आली नव्हती. त्यांची ओळख पटवण्यातही आयकर विभागाला यश आलं आहे. त्यांच्यावर आयकर विभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संबंधित बातम्या नोटाबंदी : नफा, तोटा, सरकार-विरोधकांचे दावे, 10 महत्वाचे मुद्दे
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
नवीन शैक्षणिक सत्रापासून चार नवीन कोर्सेस सुरु होणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
PM किसानचे योजनेचे पैसे दुप्पट होणार का? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती
महसूल विभागाची मोठी कारवाई! अवैध उत्खनन प्रकरणी 3 तहसीलदारांसह 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठी निलंबीत
मोठी बातमी! केंद्र सरकारने मनरेगा योजनेचं नाव बदललं, रोजगार नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार