एक्स्प्लोर
मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहताय? जाब विचारल्याने पुण्यात तरुणाची हत्या
टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड त्याच्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत होते. याचा जाब चंदनने विचारला असता, दोघांनी त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पुणे : मैत्रिणीकडे वाईट नजरेने काय पाहतोस, असा जाब विचारल्याने एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्याची केल्याची घटना पुण्यात घडली आहे. चंदन जयप्रकाश सिंह (वय 36 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड अशी आरोपींची नावं आहेत.
चंदन सिंह आणि त्याची मैत्रीण खराडी चंदननगर लेबर कॅम्पजवळ बोलत उभे होते. त्यावेळी टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड त्याच्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत होते. याचा जाब चंदनने विचारला असता, दोघांनी त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला.
या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. चंदननगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून दोघांचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement