एक्स्प्लोर

पुण्यातील फॉर्च्युनरमधील बलात्काराची घटना बनाव

पुणे : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेली सामूहिक बलात्काराची घटना बनाव असल्याचं समोर आलं आहे. वैयक्तिक भांडणातून दोन गुंडांनी महिलेला हाताशी धरुन दोन तरुणांना अडकवण्यासाठी हा बनाव रचला होता. जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात शुक्रवारी रात्री लिफ्टच्या बहाण्याने फॉर्च्युनर गाडीत दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. पण नारायणगव्हाण परिसरातील दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे या गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हा कट रचल्याचं उघड झालं आहे. प्रकाश चव्हाण आणि अजय नवले या दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी परिसरातीलच एका महिलेला हाताशी धरुन बलात्काराचा कट रचल्याचं पोलिस तपासात स्ष्ट झालं. तर बलात्काराच्या घटनेची साक्ष देणारे दोन तरुणही पैसे देऊन आणले होते. तर दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे यांच्या सांगण्यावरुन खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली संबंधित महिलेने दिली आहे. देवदर्शन करुन नारायणपूरहून परतत असताना, एकटी असल्याचं पाहून फॉर्च्युनरमधून आलेल्या दोन तरुणांनी लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर शिंदवणे घाटात दोघांनी बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली होती. शिवाय त्या दोघांना आणि गाडीचा नंबर पाहिलेले दोन साक्षीदारही ही उभे केले होते. मात्र महिलेच्या तक्रार त्रुटी असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. त्यानंतर अधिक तपास केला असता, प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी कट रचल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी अवघ्या 48 तासात या प्रकरणचा उलगडा केला. चव्हाण आणि नवले यांच्याशी दादा गव्हाण यांचा काही वर्षांपासून वाद सुरु आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी गव्हाण आणि जगदाळेनी त्या दोघांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेला आणि दोन तरुणांना सोबत घेऊन गव्हाण आणि जगदाळेने बलात्काराचा बनाव रचला. पोलिस तपासात महिलेची तक्रार बनावट असल्याचं जाणवलं आणि कट उघड झाला. पोलिस सध्या दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे यांच्या शोधात आहेत. संबंधित बातमी पुण्यात फॉर्च्युनरमध्ये गँगरेप, शिंदवणे घाटात धक्कादायक प्रकार

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget