एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सनबर्न'ला आणखी एक दणका, दंडाची रक्कम 1 कोटींवर
पुणे: पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला आणखी एक दणका बसला आहे. प्रांताधिकाऱ्यानंतर आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानेही दंड ठोठावला आहे.
'सनबर्न'साठी जागा घेताना पाच वर्षाच्या करारावर घेण्यात आली. पण त्यासाठी भाडेपट्टा शुल्क न देता, भाडे करारापोटी किरकोळ रक्कम देऊन हा व्यवहार करण्यात आला. त्यावर कारवाई म्हणून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं सनबर्नला 42 लाख रुपये दंड ठोठावला.
सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?
त्याअगोदर हवेलीच्या प्रांताधिकारी ज्योदी कदम यांनी सनबर्नला विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्याने, 62 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे सनबर्न फेस्टिव्हलला दोन्ही दंड मिळून तब्बल 1 कोटी 4 लाख रुपये भरावे लागणार आहेत. सनबर्नकडून 1 कोटी 77 लाखांचा करमणूक कर दरम्यान, पुण्यात 28 ते 31 डिसेंबरदरम्यान सनबर्न फेस्टिव्हल रंगत आहे. त्यामुळे सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली केली आहे. आयोजकांनी 1 कोटीचा डीडी आणि 77 लाखाची रोकड जिल्हा करमणूक कर विभागाकडे जमा केली आहे. संबंधित बातम्यासनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?
सनबर्न फेस्टिव्हलला 62 लाखांचा दंड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement