सांगली : कोरेगाव-भीमा इथल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांच्या चौकशीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक सांगलीत दाखल झालं आहे. या पथकासमोर भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
कोरेगाव-भीमा इथं झालेला हिंसाचार प्रकरणात श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे हे प्रमुख आरोपी आहेत. एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून, सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दुसरीकडे संभाजी भिडे गुरुजींच्या बाबत मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दंगलीला कारणीभूत खरे कोण आहेत? वडूला मी 4-5 वर्षात फिरकलो नाही. राजकीय स्वार्थ आणि मतासाठी या दंगलीचा वापर केला जातोय. प्रकाश आंबडेकर यांनी वयाला शोभेल असे वक्तव्य करायला पाहिजे. प्रकाश आंबडेकर यांनी विधान केल्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला आहे.
तसेच, पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषद ही कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत आहे. गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्य दंगलीसाठी कारणीभूत आहेत. आधी त्यांना अटक करायला हवी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.
बंद दरम्यान किंवा दंगल काळात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार का करतंय? ज्यांच्यामुळे हे नुकसान झाले त्यांच्याकडून ही भरपाई घ्यावी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे एल्गार परिषद: संभाजी भिडे
संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा : आंबेडकर
संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा : आंबेडकर
“भीमा कोरेगाव हिंसेनंतर ‘बंद’ची हाक देणाऱ्यांकडून भरपाई वसूल करा”
मी तोंड उघडलं, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल : प्रकाश आंबेडकर
कोरेगाव-भीमा प्रकरणात थेट पीएमओचा हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींच्या चौकशीची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2018 03:40 PM (IST)
संभाजी भिडे यांच्या चौकशीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक सांगलीत दाखल झालं आहे. या पथकासमोर भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -