पुणे :  पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातंं. नवनवे अभ्यासक्रम पुण्यात शिकवले जातात. हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी देशभरातून, राज्यातूनच नाही तर जगातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र दोन युरोपीयन मुलीनी खास मर्दानी खेळाची प्रशिक्षण घेण्यासाठी युरोपातून पुणे गाठलं आहे. दोन दिवस पुण्यात मुक्काम केला आणि मर्दानी खेळ शिकून घेतले आहेत. 


बेली गांधरा आणि त्यांची मैत्रीण ॲना या दोघी युरोपीयन आहेत. बेली गंधार ही मुळच्या स्पेन देशाची आहे तर ॲना ही इटलीची आहे. दोघीही सुंदर नृत्य करतात. महाराष्ट्राची संस्कृती अनेकांना आकर्षित करणारी आहे. त्यामुळे या संस्कृतीचं आकर्षण या दोघींनाही आहे.  शिवाजीराजे मर्दानी आखाडा या इंस्टाग्राम पेजवर त्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा अशा साहसी खेळांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांना शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्याची इच्छा झाली. त्यानुसार त्या शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्यासाठी थेट पुण्यात आल्या आणि दोन दिवस राहून शिकल्या. 


महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेली शिवकालीन मर्दानी युध्द कला याची आवड निर्माण झाल्याने त्या कलेचे प्रशिक्षण घेण्यासाठी स्पेन आणि इटली येथील दोन तरुणी आखाडयामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत. गुरुवर्य वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी युध्द कलेचे प्रचार आणि प्रसाराचे जे कार्य करत आहोत ते कार्य आज खऱ्या अर्थाने साध्य होताना दिसत आहे. परदेशी पाहुण्यांना आपल्या संस्कृतीचे आकर्षण कायमचं राहिले आहे. पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील साहसी खेळांचे प्रशिक्षण घ्यायला या दोघी थेट पुण्यात आल्याने सर्वांचं अभिमान वाटतं आहे, असं शिवाजीराजे मर्दानी आखाड्याचे सदस्य सांगतात. 


लावणीदेखील करतात...


एखादी गोष्ट शिकण्यासाठीची ह्या दोघींची तळमळ त्यांना थेट त्यांच्या देशातून आपल्या देशात घेऊन आली. फक्त 2 दिवसाच्या प्रशिक्षणात दोघीही अतिशय कमालीची लाठीकाठी खेळताना दिसत आहेत. यासोबतच ह्या दोघीही सुंदर लावणी करतात. 


व्हिसा प्रक्रियेमुळे त्यांना दिवस पुण्यात थांबता येणार नाही...


भारतात राहण्यासाठी व्हिसा महत्वाचा असतो. संपूर्ण प्रक्रिया करुन भारसतात राहता येतं. मात्र या दोघींंना  व्हिसा प्रक्रियेमुळे त्यांना दिवस पुण्यात थांबता येणार नाही आहे.  त्यामुळे त्यांनी सध्या फक्त 2 दिवसाचे प्रशिक्षण घेतले. पुढचे प्रशिक्षण त्या ऑनलाईन पद्धतीने घेणार आहेत. त्यांनी त्यांची आवड जपली आणि राज्याची मर्दानी खेळ आता या दोघी युरोहात घेऊन जाणार आहेत. 


 






 


इतर महत्वाची बातमी-


Weather Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! मोठ्या ब्रेकनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुण्यातलं वातावरण कसं असेल?