Orange Cultivation : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे फळ म्हणजे संत्रा (Orange). संत्रा हे आपल्या देशात सर्वाधिक खाल्ल्या जाणार्या फळांपैकी एक आहे. मात्र, नागपूरची संत्र्याची (Nagpuri Orange) चव काही वेगळीच आहे. जगभरात नागपूरच्या संत्र्याने भूरळ घातली आहे. नागपूरच्या संत्र्याला असलेल्या चवीमुळं त्याची जगभरात वेगळी ओळख आहे. देशातील एकूण संत्रा उत्पादनापैकी 80 टक्के संत्र्याचं उत्पादन हे फक्त महाराष्ट्रात होते. दरम्यान, जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याची लागवड कशाप्रकारे केली जाते. त्यासाठी हवामान कसे असावे? यासंदर्भातील माहिती पाहुयात.
संत्र्याची लागवड करताना नेमकी काय काळजी घ्यावी
संत्र्याच्या लागवडीसाठी काळी माती चांगली मानली जाते. संत्र्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी शेतात पाण्याचा निचरा होण्याची चांगली व्यवस्था करावी. काळ्या मातीशिवाय वालुकामय चिकणमातीमध्येही संत्र्याचे उत्पादन चांगले येते. संत्रा लागवडीसाठी, मातीचे pH मूल्य 5.5 ते 7.5 दरम्यान असावे. संत्र्याच्या झाडांच्या वाढीसाठी 13 ते 37 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे. त्याच्या चांगल्या पिकासाठी, उबदार आणि किंचित दमट हवामान आवश्यक आहे. संत्र्यांच्या पिकासाठी चांगला पाऊस गजरेचा असतो. संत्रा पिकासाठी 50 ते 53 टक्के आर्द्रता लागते. या आर्द्रतेत झाडांची वाढ चांगली होते. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते.
संत्रा लागवडीसाठी योग्य काळ कोणता
कोणत्याही फळाच्या कापणीसाठी एक निश्चित वेळ ठरलेली असते. वेळेवर पिकाची काढणी केली तर चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते. त्यामुळे संत्रा लागवडीलाही हे सुत्र लागू होते. शेतकऱ्यांनी संत्र्याची लागवड करताना लक्षात ठेवावे की उन्हाळ्यात संत्र्याची लागवड करावी. जून आणि जुलै महिना हा संत्रा लागवडीसाठी चांगला आहे. तर थंडीच्या काळात फेब्रुवारी ते मार्च हे महिने चांगले मानले जातात. दरम्यान, जगप्रसिद्ध असलेल्या नागपूर संत्र्याचे इतर देशातही उत्पादन घेता येणं शक्य होणार आहे. फक्त ज्या भागात त्यासाठी पोषक वातावरण आहे, तिथं संत्र्याचं उत्पादन घेता येतं.
संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात
नागपुरी संत्री ही संत्र्याची एक जात आहे. ती मुख्यत: नागपूर जिल्हा आणि आसपासच्या भागात पिकविली जाते. संत्र्याचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते. संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. संत्र्याचा रस अनेक लोक आवडीने पितात. संत्र्याचे विविध प्रकार आज लोक खात आहेत. संत्र्याच्या झाडाची गडद हिरवी पाने आणि लहान पांढरी फुले आपल्याला आकर्षित करतात. अनेक मधमाशा ह्या फुलांच्या गोड रसाचा आनंद लुटतात. अनेक कारणांमुळे संत्रे हे विविध भागांमध्ये लोकांच्या आहाराचा भाग बनले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: