Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


पुणे महानगरपालिका


पोस्ट - योग शिक्षक



  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, योगशिक्षक प्रमाणपत्र

  • एकूण जागा - 54

  • वयोमर्यादा - 18 ते 45  वर्ष

  • नोकरीचं ठिकाण - पुणे

  • थेट मुलाखत होणार आहे.

  • मुलाखतीचं ठिकाण- इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे - 411005 

  • मुलाखतीची तारीख - 1 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.pmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर सेवाभरतीवर क्लिक करा. आरोग्य विभागात संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक


एकूण 288 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई



  • शैक्षणिक पात्रता - ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी पदवीधर आणि MS-CIT, शिपाई पदासाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण

  • एकूण जागा - 288 (यात ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी 233 आणि शिपाई पदासाठी 55 जागा आहेत.)

  • वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 सप्टेंबर 2022

  • तपशील - thanedistrictbank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या quick links मध्ये Bank Recruitment for Junior Clerk-2022 आणि Bank Recruitment forPeon-2022 या लिंक दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.


पोस्ट - अटेंडंट-कम-टेक्निशियन ट्रेनी (NAC)



  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, एकात्मिक पोलाद प्रकल्प आणि राष्ट्रीय प्रशिक्षणार्थीसाठी राष्ट्रीय परिषदेने जारी केलेले प्रमाणपत्र (NAC)

  • एकूण जागा - 146

  • वयोमर्यादा - 18 ते 28 वर्ष

  • नोकरीचं ठिकाण- बोकारो (झारखंड)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.sail.co.in 


NLC इंडिया लिमिटेड


विविध पदांच्या 226 जागांसाठी भरती होत आहे.



  • पहिली पोस्ट - एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade)

  • शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल /मेकॅनिकल अँड प्रोडक्शन /इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर / इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / पॉवर सिस्टम्स / पॉवर सिस्टम आणि हाय व्होल्टेज / इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर प्लांट/एनर्जी सिव्हिल/सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनिरिंग पदवी, पाच वर्षांचा अनुभव

  • एकूण जागा-  167

  • वयोमर्यादा - 36 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.nlcindia.in 


दुसरी पोस्ट - डेप्युटी मॅनेजर (E3 Grade)



  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास), एक वर्षाचा अनुभव

  • एकूण जागा- 39

  • वयोमर्यादा - 32 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.nlcindia.in 


तिसरी पोस्ट - मॅनेजर (E4 Grade)



  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास/जनसंपर्क / जनसंवाद / पत्रकारिता) किंवा LLB, पाच वर्षाचा अनुभव

  • एकूण जागा- 20

  • वयोमर्यादा - 36 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.nlcindia.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Recruitment of Executives in various disciplines यातली detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)