पुणे :  स्वातंत्र्य दिन आणि सुट्टी असल्याने अनेक (Pune Metro) पुणेकर मेट्रो प्रवास करताना दिसत आहे. पुण्यातील मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी बघायला मिळत आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनीक या मार्गावरील शिवाजी नगर स्थानकावर गर्दी बघायला मिळत आहे. सुट्टी असल्याने अनेक पुणेकर खास मेट्रोचा अस्वाद घेण्यासाठी आणि आपल्या पाल्यांना मेट्रोची सफर घडवण्यासाठी पोहचल्याचं दिसत आहे.


काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण केलं. त्यानंतर पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला. पुणेकरांनी वनाज ते रुबी हॉल आणि सिव्हिल कोर्ट ते फुगेवाडी या मार्गावर प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे. पुणेकरांसाठी मेट्रो नवीन आहे. त्यामुळे काही पुणेकर खास मेट्रोची सफर करण्यासाठी प्रवास करताना दिसत आहेत. पुण्यातील मेट्रो स्थानकदेखील ऐतिहासिक बनवले असल्याने इतिहासासोबतच भविष्याच्या धोरणांची माहिती अनेक पालक या मेट्रो प्रवासादरम्यान आपल्या पाल्यांना देताना दिसत आहे. सुट्टी आणि त्यात स्वातंत्र्य दिन हा मुहूर्त साधत पुणेकरांनी मेट्रोत तुडुंब गर्दी केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पुणे मेट्रोचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान 2 लाख 63 हजार प्रवाश्यांनी मेट्रोने प्रवास केला होता. त्यामुळं अवघ्या सहा दिवसांत पुणे मेट्रोची तब्बल 50 लाखांची उलाढाल झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी तर रविवारची सुट्टी दिवशी मेट्रो प्रवासालाच पसंती दिली होती. एका दिवसभरात 96 हजारांहून अधिक जणांनी मेट्रोने प्रवास केला यातून 16 लाख 43 हजार रुपयांची कमाई ही झाली होती. पुणेकरांच्या प्रवासाने मेट्रोची मोठी कमाई होताना दिसत आहे. 


मात्र मेट्रोकडून विद्यार्थ्यांना तिकिटांवर 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यासोबतच शनिवार, रविवार नागरिकांनादेखील तिकिटांमध्ये सवलत देण्यात येत आहे. साधा, सरळ आणि सोपा प्रवास होत असल्याने अनेक पुणेकर मेट्रोला प्राधान्य देताना दिसत आहे. 


सकाळी सहापासून सुरू राहणार मेट्रो


पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. वेळापत्रकाचा बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार आहे. 


पुणे मेट्रोचं वेळापत्रक कसं असेल?



  • वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग

  • सकाळी 6 ते 8 - दर 15 मिनिटांनी 

  • सकाळी 8 ते 11 - दर 10मिनिटांनी

  • सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी

  • दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10मिनिटांनी

  • रात्री 8 ते 10 - दर 15मिनिटांनी


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jail News : स्वातंत्र्यदिनी व्हा मुक्त! पुण्यासह राज्यातील 186 कैद्यांची होणार सुटका