एक्स्प्लोर

पती म्हणाला, 'ते मूल माझं नाही', बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवत पोबारा, पुण्यातील संतापजनक प्रकार

पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई-बापांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्चजवळ कापडी पिशवीत गुंडाळून ठेवले आणि निघून गेले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना पिशवीतले हे बाळ सापडलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता समोर आले हे धक्कादायक सत्य.

पुणे : पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीला झालेला मुलगा आपल्यापासून झाला नसल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे त्याने पत्नीला माझ्यासोबत राहायचे असेल तर या मुलाला सोडून दे असे सांगितले. आणि त्यानंतर या दोघा आई-बापांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्चजवळ कापडी पिशवीत गुंडाळून ठेवले आणि निघून गेले. त्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना पिशवीतले हे बाळ सापडलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन या बाळाच्या आई बाबांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता समोर आले हे धक्कादायक सत्य.

खडकी पोलिसांनी दोन महिन्याचा या गोंडस बाळाचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅपला डीपी ठेवला होता. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी हा फोटो शेअर देखील केला होता. त्यानंतर व्हायरल झालेला हा फोटो त्या बाळाच्या मामाच्या व्हॉट्सअॅप वर जाऊन पोहोचला. मामाने आपल्या बहिणीला बाळा विषयी विचारणा केली असता त्यांनी काही दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र मामाने व्हॉट्सअॅपवर ज्या बाळाचा फोटो पाहिला होता तोच आपला भाचा आहे, यावर तो ठाम होता.

त्यानंतर मामाने थेट पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचे आई वडील आणि मामासह ससून रुग्णालय गाठत त्यांना बाळ दाखवले. परंतु येथेही आई-वडील हे बाळ आपलेच आहे हे मान्य करायला तयार नव्हते. यावेळी पोलिसांना त्यांच्या वागण्या-बोलण्यात विसंगती जाणवली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता अखेर सत्य समोर आले.

सात वर्षापूर्वी या जोडप्याचे लग्न झाले होते. यातील नवरा मुलगा हा इंजिनिअर असून एका कंपनीत चांगल्या पदावर काम करतो. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. परंतु पती-पत्नी सातत्याने होणाऱ्या वादामुळे पत्नी तीन वर्ष माहेरी राहिली होती. त्यानंतर 1 वर्षापूर्वी ते पुन्हा एकदा एकत्र आले. एक वर्षानंतर त्यांना मुल देखील झालं. परंतु हे मूल आपलं असल्याचा संशय आरोपी पतीला होता. यावरून त्यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाले. आणि आरोपीने पत्नीला माझ्यासोबत राहायचे असेल तर कुणाला तरी एकाला सोडून द्यावे लागेल असे सांगितले. यानंतर त्यांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्च जवळ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले अन् निघून गेले.

पोलिसांनी याप्रकरणी त्या बाळाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तर बाळ सध्या ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्यवस्थित आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Chhath Puja : भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'
भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Gunratna Sadavarte : 'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
Mohan Bhagwat On Diwali: पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget