एक्स्प्लोर

चीनी वस्तूंना गावात नो एंट्री, पुण्यातल्या या गावाने केला ठराव

पुणे जिल्ह्यातील कोंढवे - धावडे गावाने यापुढे गावात चिनी वस्तू वापरणार नसल्याचा निर्धार केला आहे. गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने तसा ठराव करण्यात आलाय. येत्या एक जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुणे : सध्या भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चायनिज वस्तूंवर बंदीची मोहिम सुरु आहे. दोन्ही देशातील संबंध विकोपाला गेले असून चिनी वस्तूंवर टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यात देखील या विषयावर आंदोलनं करण्यात आली. चिनी मोबाईल, चिनी टीव्ही या वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आली. मात्र पुणे जिल्ह्यातील कोंढवे - धावडे गावाने यापुढे गावात चिनी वस्तू वापरणार नसल्याचा निर्धार केला आहे. गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने तसा ठराव करण्यात आलाय. येत्या एक जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चीनेने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवानांना वीरमरण आले तर चीनच्याही काही सैनिकांना भारतीय जवानांनी मारले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण असून चिनी वस्तूंवर बहिष्काराची मोहिम सुरु आहे. यातच कोंढवे - धावडे गावाने हा निर्णय घेतला आहे. चीनी वस्तूंना गावात नो एंट्री, पुण्यातल्या या गावाने केला ठराव या गावातील दुकानदार, व्यापारी वर्ग यांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी पत्र देऊन चायना वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण गावात बॅनर लावून, दवंडी देऊन चायनीज वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आले. त्याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य  हे भारतीय बनावटीचे वापरण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत अथवा शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही कामासाठी चायनीज वस्तूचा वापर केला जाऊ नये असे निर्देशही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे. पुण्यालगत असलेल्या या कोंढवे धावडे या गावची लोकसंख्या अंदाजे 15 हजार इतकी आहे. या गावात अनेक दुकाने आहेत. यापूर्वी खरेदी केलेल्या वस्तू विकण्याची मुभा येथील विक्रेत्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कुठल्याही चायना वस्तू खरेदी करून त्याची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सरपंच नितीन धावडे यांनी याविषयी एबीपी माझाशी बोलताना  सांगितले की, आम्ही हा निर्णय घेतला आहे. हे शक्य होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. पण कुठुनतरी याची सुरुवात झाली पाहिजे, हा विचार करून आम्ही हा ठराव केला. त्याला इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार येत्या 1 जुलै पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असं धावडे यांन सांगितलं.
गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget