सातारा: राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. त्यामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेद्वार अभिजीत बिचुकले यांचं नाव मतदार यादीतून गायब झालं. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात अभिजीत बिचुकले यांनी संताप व्यक्त केलाय.


साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मतदार केंद्रावर अभिजीत बिचुकले मतदार आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी गेले असता त्यांचे मतदार यादीत नाव नसल्याचं स्पष्ट झालं. त्याविरोधात बिचुकले यांनी संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ त्या परिसरात गडबड उडाल्याची पहायला मिळाली.


विशेष म्हणजे बिचुकले यांच्या पत्नीचं नाव यादीत आहे. त्यावरुन अभिजीत बिचुकले यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी मतदान केंद्रावरच गोंधळ घातला. मी स्वत: उमेदवार असून माझं नाव मतदार यादीत नाही., हे असं असेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्न विचारत त्यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली आहे.


वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत असतात.  खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकले यांना अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यानी केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.


विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतं आहेत. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.


पहा व्हिडिओ: Pune Graduate Constituency Election | अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं नाव मतदार यादीतून गायब



महत्वाच्या बातम्या: