हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सद्यस्थितीत 1122 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात 150 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. हैदराबाद हा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप सुरुंग लावण्याची प्रयत्न करीत आहे. याची सुरुवात विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आपला आधार मजबूत करून सुरूवात केली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून 4 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.
मागच्या वेळी टीआरएसचा विजय
मागील वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्ष तेलंगना राष्ट्र समितीने (टीआरएस) विजय मिळविला होता. टीआरएसने 99 जागा जिंकल्या. त्याच वेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष एआयएमआयएमलाही 44 जागा मिळाल्या. पण यावेळी भाजपने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपला केवळ चार जागा मिळाल्या
मागच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मागील निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या. तर काँग्रेसला दोन प्रभाग व टीडीपीने एक जागा जिंकली होती.
नगरसेवकांची जबाबदारी काय?
कोणत्याही शहरात प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी नगरसेवक जबाबदार असतात. इमारत व रस्ते बांधकाम, कचरा विल्हेवाट लावणे, शासकीय शाळा, पथदिवे, रस्ते देखभाल, शहर नियोजन, स्वच्छता व आरोग्य या सर्व बाबी महापालिका हाताळतात.