एक्स्प्लोर

शिवसेनेने पुणे महापालिकेसमोर कचरा फेकला

पुणे: पुण्यातील कचरा प्रश्नाला आता राजकीय वळण लागलं आहे. कारण मनसे पाठोपाठ आता शिवसेनेनेही कचरा फेकून आंदोलन केलं. शिवसेनेने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर कचरा टाकून आंदोलन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल महापौर मुक्ता टिळक यांच्या केसरी वाड्यातील घरासमोर कचरा टाकून आंदोलन केलं होतं. दरम्यान शिवसेनेने आजच्या या आंदोलनात थाळी नाद आणि घंटानाद करण्यात आल्याने, पालिकेचा परिसर दणाणून गेला. दोन दिवसांमधे हा प्रश्न सुटला नाही तर महापौर आणि पालकमंत्र्यांच्या​ कार्यालयामध्ये कचरा टाकण्यात येईल असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. मनसेने महापौरांच्या घरासमोर कचरा फेकला पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील ग्रामस्थ मागील 20 दिवसांपासून तेथील  कचरा  डेपोमध्ये  कचरा  टाकण्यास विरोध करित आहे. यावर महापौर,महापालिका आयुक्तांच्या समवेत बैठका निष्फळ ठरल्या. यात महापौर आणि पालकमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याने कचरा प्रश्न आधिक गंभीर झाला असून, या पार्श्वभूमीवर काल महापौर मुक्ता टिळक यांच्या घराबाहेर मनसेकडून कचरा टाकून आंदोलन केले. पुणेकर जनतेला कचरा कोंडीमध्ये ठेवून महापौर परदेश दौयावर जातात. ही निषेधार्थ बाब असून प्रत्येकाच्या घरात कचरा साठला आहे .यामुळे आज महापौरांच्या घरासमोर कचरा फेकून निषेध व्यक्त केला. येत्या काळात प्रश्न न सुटल्यास महापालिका आयुक्तांच्या घरासमोरदेखील कचरा फेकू असा इशाराही मनसेने दिला. राष्ट्रवादीचं आंदोलन डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला सतत लागणाऱ्या आगीमुळे फुरसुंगीकरांचं जगणं मुश्कील झालं आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या कचरा डेपोला जोरदार विरोध केला आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी फुरसुंगीला भेट दिली. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. हा परिसर कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त व्हावा अशी मागणी करत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कचऱ्याची प्रतिकात्मक अंतयात्राही काढण्यात आली. ‘या कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. तेव्हा ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्याप त्यांनी आपला शब्द पाळला नाही.’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न? पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे. इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो. त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे. संबंधित बातम्या : पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम  19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’ ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन  पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Parbhani: दुष्काळाने सोयाबीनचा हाती आलेला घास हिरावला! उरलं सुरलं पीक पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्याची धडपड; परभणीतील विदारक चित्र
दुष्काळाने सोयाबीनचा हाती आलेला घास हिरावला! उरलं सुरलं पीक पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्याची धडपड; परभणीतील विदारक चित्र
Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Embed widget