एक्स्प्लोर

फेसबुकवरील राड्यातून दगडफेक, निष्पाप तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी

आपल्या पदरी फक्त अपंग शरीराच्या अनंत वेदना, उध्वस्त संसार आणि कर्जाचा डोंगर उरल्याचे लक्षात आल्यावर वसंताने काही महिन्यांपूर्वी जगण्याची इच्छाच संपल्याचे सांगितले होते. अखेर त्या वसंताने या जगाचा निरोप घेतला, तोही त्याचा फाटलेला संसार उघड्या डोळ्याने पाहात.

पंढरपूर : कोणीतरी माथेफिरु सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी करणारे लिखाण करतो, त्यानंतर सोलापुरात दंगल उसळते. गाड्यांची तोडफोड सुरु होते. याच दंगलीदरम्यान मुंबईहून सोलापूरला निघालेल्या एका गाडीवर दगडफेक सुरु होते. गाडीतील अनेक प्रवासी जखमी होतात. त्यात वसंत रुपनर नावाचा तरुणही गंभीर जखमी होतो. समाजकंटकांनी भिरकावलेल्या दगडांपैकी एका दगडाने वसंताच्या डोक्याचा वेध घेतला होता. त्यानंतर वसंत दोन महिने कोमात होता. डोक्याला जोरदार मार लागल्याने वसंतला पॅरालिसिस झाला. परंतु सरकारने अथवा इतर कोणीही त्याची मदत केली नाही. अखेर गेली पाच वर्ष जीवन-मृत्यूशी सुरु असलेला वसंताचा संघर्ष आज संपला आहे. पाच वर्षांपूर्वी फेसबुकवर एका माथेफिरूने महापुरुषांची बदनामी केली त्यामुळे सोलापुरात दंगल उसळली होती. त्याचदरम्यान (31 मे 2014 )मुंबईहून येत असलेल्या एका बसवर दगडफेक झाली. या बसमधून गावाकडे जाणारा वसंत रुपनर या दगडफेकीमुळे जखमी झाला. जमीन विकून, कर्ज काढून वसंतच्या पत्नीने त्याच्यावर उपचार केले. परंतु वसंत कायमचा अधू झाला. वसंतला पॅरालिसिस झाला होता. गेल्या पाच वर्षात वसंताकडे ना जुन्या सरकारने पहिले ना नव्या सरकारने. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि कमावता वसंत कायमचा अधू बनला. त्याची दोन मुले एका रात्रीत पोरकी झाली मात्र तरीही समाज, सत्ताधारी आणि प्रशासनाला रुपनर कुटुंबाची आठवण झाली नाही. आपल्या पदरी फक्त अपंग शरीराच्या अनंत वेदना, उध्वस्त संसार आणि कर्जाचा डोंगर उरल्याचे लक्षात आल्यावर काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना अतिशय निराश झालेल्या वसंताने जगण्याची इच्छाच संपल्याचे सांगितले होते. अखेर त्या वसंताने या जगाचा निरोप घेतला, तोही त्याचा फाटलेला संसार उघड्या डोळ्याने पाहात. आज वसंताच्या पत्नीलाही जगण्याची इच्छा उरलेली नाही. वसंतानंतर ज्या सरकारकडून रुपनर कुटुंबाने अपेक्षा ठेवली होती, त्या सरकारनेही या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. मदत मिळवण्यासाठी रुपनर कुटुंबीयांनी अनेक शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घातले, परंतु पदरी केवळ निराशाच आली. आठ महिन्यांपूर्वी वसंत रुपनर यांच्याशी केलेली बातचित | 13 ऑगस्ट 2018
एबीपी माझाने काही महिन्यांपूर्वी वसंताची व्यथा समाजासमोर मांडली. त्यानंतर लोणावळ्याच्या एकटा निराधार संघाने पुढाकार घेत वसंताच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती. जागून काय करायचे? असे म्हणणारी वसंताची पत्नी सखुबाई पूर्णपणे कोलमडून गेली आहे. वसंताच्या मोठ्या मुलाच्या (राहुल) शिक्षणाची जबाबदारी ज्या संस्थेने उचलली आहे, त्याच संस्थेने त्याच्या लहान मूकबधिर भावाच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील उचलली आहे. वसंत रुपनर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या पत्नी सखूबाई यांच्याशी केलेली बातचित | 5 ऑगस्ट 2014
परंतु अजूनही सरकार आणि त्यांचे प्रशासन वसंतच्या कुटुंबाबाबत इतके संवेदनाशुन्य रितीने का वागत आहे, असा प्रश्न लोक विचारत आहेत. कोणतीही चूक नसताना वसंत असंख्य वेदना भोगून निघून गेला आहे. किमान आतातरी फडणवीस सरकारने त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात देऊन आधार द्यावा, अशी मागणी लोक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Sanjay Raut : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, खासदार संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी; म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्ताव आणला तर...
नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, खासदार संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्ताव आणला तर...

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Jalna news: गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
Embed widget