Pune Crime News : मुलगा न होता दोन मुली झाल्याने (Pune Crime News) मुलींना झोपेत दुध पाजून त्यांना मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाच्या हव्यासापोटी त्यांनी गर्भवती सुनेला मुले गोरे होण्याकरीता वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या होत्या. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुळ्या मुलींचे वडिल अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय 62), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी (वय 55), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी(वय 26) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुनेचा भाऊ श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय 35) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2018 ते 26 नोव्हेबर 2019 आणि 6 फेब्रुवारी 2020 रोजी घडला.
तक्रारदार असलेले श्रीकृष्णा प्रताप लोभे यांच्या बहिणीसोबत हा प्रकार घडला आहे. बहीण उर्मिला अतूल सूर्यवंशी यांना मुलगाच हवा म्हणून सासरच्या कुटुंबियांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. मुलं गोरी व्हावी यासाठी गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या. मात्र त्यानंतर उर्मिला अतुल सूर्यवंशी यांना दोन जुळ्या मुली झाल्या बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या.
दुध पाजून झोपवले होते अन्...
उर्मिला हिने 26 नोव्हेबर 2019 मुलींना दुध पाजून झोपवले होते. रिद्धी, सिद्धी अशी या दोन्ही मुलीची नावं होती. सात महिन्याची असताना सिद्धीला तिच्या वडिलांनी बाहेरील दुध पाजले. त्यामुळे तिचा मृत्यु झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी रिद्धी नावाच्या 9 महिन्यांच्या मुलीला बाहेरील दुध पाजून तिला जीवे ठार मारले. मुली झोपेत असल्याने पाजलेले दुध श्वसनलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु (Death) झाला. या प्रकरणी कुटुबियांनी सासरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सासू, सासरे, दीर आणि पती यांच्यावर खुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे.
बापच ठरला वैरी...
पुण्यात मागील काही दिवसांपासून मुलगा होण्यासाठी जादुटोण्याचे प्रकार सुरु होते. त्यामुळे पुरोगामी पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच आता मुलगा हवा आणि तोदेखील गोऱ्या रंगाचा हवा असल्याने गोळ्या खाण्यास दिल्या आणि मुली झाल्याने दोन्ही मुलींचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आल्याने सुशिक्षित पुण्यात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा-