Nashik News : मनमाड-दौंड लोहमार्गाच्या (Manmad Duand) दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत बेलापूर (Belapur) ते पढेगावदरम्यान महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने आजपासून 22 जुलै पर्यंत तीन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-भुसावळ मेमू आणि निजामबाद-दौंड डेमू या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या चार गाड्या नाशिकमार्गे (Nashik) वळवण्यात आल्या आहेत. इतर 6 गाड्यांचे देखील मार्ग बदलण्यात आले आहे.
मनमाड-दौंड मार्गावर (Manmad Railway) आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे लाईनचे (Railway Line) दुहेरीकरण करण्यात येत असल्याने मेगाब्लॉक घेण्यात आला असून मेगा ब्लॉकमुळे (Mega Block) तीन गाड्या रद्द तर इतर 4 गाड्यांचे मार्ग आले बदलण्यात आले आहेत. मनमाड दौंड लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या अंतर्गत बेलापूर ते पडेगाव दरम्यान महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने आजपासून तीन दिवस म्हणजे 20 जुलै पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या चार गाड्या नाशिक मार्गे वळवण्यात आले आहेत. तर सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
दरम्यान यशवंतपुर-चंदिगड एक्सप्रेस ही लोणावळा-वसई रोडमार्गे जाईल. तर पुणे-जबलपूर एक्सप्रेस, पुणे-हातीया एक्सप्रेस, पुणे-गोरखपूर एक्सप्रेस, पुणे-लखनऊ एक्सप्रेस ,पुणे-हातीया एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. तर दौंड-निजामाबाद डेमु, निजामाबाद-दौंड डेमू, पुणे-भुसावळ मेमु या गाड्या 20 जुलैपर्यंत रद्द करण्यात आले आहे. तसेच बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा अर्थात गोवा एक्सप्रेस, यशवंतपुर-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस, लखनौ-पुणे एक्सप्रेस या गाड्या नाशिकमार्गे धावणार आहेत.
सर्वच गाड्या नाशिकमार्गे
सर्वच गाड्यांचा मार्ग कल्याण, इगतपुरी, नाशिकरोडमार्गे आहे. कारण मनमाडहुन जाणारे या सर्वच प्रवासी मेल एक्सप्रेस गाड्यांचा सध्याचा मार्ग हा मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड असा आहे. पण मेगाब्लॉकमुळे या सर्व गाड्या दौंडवरून मनमाडला येण्यासाठी पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड मार्गे मनमाडला येथील व येथून त्यांचा मार्ग पुढे सध्या जसा आहे, तसाच राहणार आहे.
मुंबई-पुणे ट्रेनही रद्द
मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. आज (19 जुलै) आणि उद्या (20 जुलै) या ट्रेन बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या :
Mumbai Pune Train Cancel : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; मुंबई-पुणे धावणाऱ्या 'या' ट्रेन रद्द