एक्स्प्लोर
पुण्यातील सारसबागमधल्या कॅनॉलमध्ये दाम्पत्याने उडी मारली
आधी पत्नी कांचन यांनी पाण्यात उडी मारली असावी, त्यानंतर पती प्रदीप यांनी उडी मारल्याचा अंदाज आहे.

पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील विपश्यना केंद्र कॅनॉलमध्ये एका दाम्पत्याने उडी मारली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या जोडप्याला सुखरुप बाहेर काढलं आहे. बुधवारी (7 नोव्हेंबर) रात्री अकरा वाजता ही घटना घडली.
प्रदीप शेंडगे आणि कांचन शेंडगे असं या जोडप्याचं नाव आहे. आधी पत्नी कांचन यांनी पाण्यात उडी मारली असावी, त्यानंतर पती प्रदीप यांनी उडी मारल्याचा अंदाज आहे. दोघे कॅनॉलमधील एका झाडाला धरुन असल्याचं दिसलं. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने, दोघे बाहेर पडू शकत नव्हते.
अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने या दाम्पत्याला सुखरुप बाहेर काढलं. पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
