पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel) यांना देण्यात येणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कराचे स्वरुप रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असं आहे. सदर पुरस्कार 28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ देण्यात येतो. हा पुरस्कार सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो.
या आधी माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा. शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. बी. एल. मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा. डॉ. मा.गो. माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. तात्याराव लहाने, प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.
संबंधित बातम्या :
- कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटो; सरकार म्हणतं, 'ज्यांचे पैसे, त्यांचाच फोटो'
- Chhattisgarh : युवकाच्या कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा आदेश
- Chhattisgarh Maoist Attack | बिजापूर चकमक हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, नक्षलविरोधी अभियान सुरुच राहणार : मुख्यमंत्री बघेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha