एक्स्प्लोर

Pune Bypoll election : आधी रविंद्र धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा; मनसेचं नेमकं चाललंय काय?

मनसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचं जय्यत स्वागत केलं. त्यावर आता मनसेने पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे.

Pune Bypoll election :  पुण्यातील कसबा मतदार (Pune Bypoll Election) संघाच्या निवडणुकीत मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे. त्यात महाविकास आघाडीची प्रचारयात्रा थेट मनसेच्या कार्यालयात धडकली होती. त्यांनंतर मनसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचं जय्यत स्वागत केलं. मनसेनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या केलेल्या स्वागताची चांगलीच चर्चा झाली. अनेक तर्कवितर्क लावण्यात आहे. त्यावर आता मनसेने पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आलं आहे. 

'भेट घेणं अन् पाठिंबा देणं दोन वेगळ्या गोष्टी'

काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे 2 मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यांनी पत्रकात लिहिलं आहे. 

संभ्रम निर्माण करुन नये'

राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये, असंही स्पष्टीकरण त्यांनी मनसेकडून देण्यात आलं आहे.

या पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मनसे नक्की कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला मात्र प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मनसेवर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यात सध्या सगळीकडे पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सगळ्या पक्षाकडून प्रचारासाठी पदयात्रा, सभा आयोजित केल्या जात आहे. कसब्यातील सगळ्या जनतेच्या भेटीघाटी घेणं सुरु आहे. प्रचारासाठी भाजपकडून मोठे नेते सहभागी होणार आहे. त्यात देशाचे गृहमंत्री अमित शाहदेखील येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Embed widget