एक्स्प्लोर

Pune Bypoll Election : राहुल कलाटेंची बंडखोरी ते प्रचाराची रणनिती; काय म्हणाले अजित पवार?

  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी केली तर मतांची विभागणी होणार आणि त्यांचा फायदा भाजपला होणार, असं भाजपच्या नेत्यांना वाटणार त्यामुळे ते कॉंग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत, असं वक्तव्य विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

Pune Bypoll Election :  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी (Kasba Bypoll Election केली तर मतांची विभागणी होणार आणि त्यांचा फायदा pune bypoll election भाजपला होणार, असं भाजपच्या नेत्यांना वाटणार त्यामुळे ते कॉंग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत, असं वक्तव्य विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पुण्याचे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र त्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अर्ज मागे घेऊ नका असं सांगितलं होतं. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार म्हणाले की, भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणाऱ्या कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांना भेटले यात राजकारण आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला कोणीही बंडखोरी करु नये, असं वाटणार त्याचप्रमाणे बंडखोरी केली तर मतांची विभागणी होणार आणि त्याचा भाजपला फायदा होणार,असं भाजपला वाटणार आहे. या गोष्टी साहजिक आहे. हे राजकारण आहे आणि राजकारणात या गोष्टी चालणार आहेत. त्यामुळे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. 

प्रचारात सक्रिय राहणार

माजी आमदार मोहन जोशी आणि माझी भेट झाली. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्याबरोबर होते, असं ते म्हणाले. त्यांनी प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी वेळ मागितली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याने आम्ही एकत्र प्रचाराच उतरणार आहोत. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर उमेदवार असल्याने मी प्रचारात सक्रिय असणार आहे, असं अजित पवार म्हणाले. 

राज ठाकरेंसोबत चर्चा झाली नाही...

कसबा मतदार संघाच्या बाबतीत राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही यावर अजित पवार म्हणाले की, आमचं आणि राज ठाकरेंचं कोणतंही बोलणं झालं नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांचं किंवा बाकी कोणत्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं राज ठाकरेंसोबत बोलणं झालं असेल तर त्यासंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही असं अजित पवार म्हणाले. मात्र पोटनिवडणूक बिनविरोध करा, अशी मागणील राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर त्यांचा पाठिंबा भाजपला असल्याचं स्पष्ट झालं होतं. 

राहुल कलाटेंना कोणाची फूस?

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांंनी बंडखोरी करणार असं जाहीर केलं आणि त्यांनी उमेदवारी अर्जदेखील भरला. राहुल कलाटेंना नेमकी कोणाची फूस आहे असं विचारल्यास अजित पवार म्हणाले की, त्यांना कोणाची फूस आहे यासंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही मात्र ज्यावेळी राहुल कलाटे आणि माझी भेट होईल तेव्हा मी त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचारीन असं त्यांनी स्पष्ट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget