एक्स्प्लोर

Pune bypoll election : वसंत मोरेंची पुन्हा राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका? फेसबूक पोस्ट चर्चेत...

कोणत्या पक्षाला सहानुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित समजा, कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार?, असा प्रश्न वसंत मोरे त्यांनी उपस्थित केला आहे.

Pune Bypoll election :  मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant more) पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. एकीकडे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाजपसाठी या दोन पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात अशी भूमिका घेतलेली असताना, या निवडणुकीत भाजपच्या विरोधात उमेदवार दिलेले नसताना वसंत मोरे यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव नक्की आहे, असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत ही टीका केली आहे. 

सध्या पुण्यात सगळीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आजच सगळ्या पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला आणि सगळे पक्ष प्रचाराची तयारी करत आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्या भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फळाला आला नाही त्यामुळे आता निवडणुकीची तयारी दोन्ही मतदार संघात जोरात सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनीदेखील पत्र लिहून आवाहन केलं होतं.  त्यातच आता मनसेच्याच वसंत मोरे यांची ही फेसबूक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

वसंत मोरे म्हणाले की, मागील अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या जात आहे. निवडणुकीची सरकारला भीती वाटत आहे. त्यामुळे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे. जो मनात हरतो तो रणात जिंकू शकत नाही, हे सरकार मनात हरलं आहे. त्यांचा मनामधून पराभव झालेला दिसत असल्याचंही ते म्हणाले. एकीकडे भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत आहे आणि त्यात वसंत मोरेंनी सरकारवर टीका केली आहे. त्यात त्यांनी हे माझं वैयक्तित मत असल्याचंदेखील बोलून दाखवलं आहे. 

पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
माझा शिंदे - फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे दोन आमदार नुकतेच मयत झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवलीसुद्धा नसेल. तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा. कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार?, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget