पुणे: अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना सध्या दिसतंय, दररोज चार ते पाच मोठ्या अपघातांच्या घटना समोर येत आहेत. आज पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. एकूण 49 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. पडळसरी आणि खंडाळ्याच्या मधोमध असलेल्या बोरघाटात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. कराडहून ही बस मुंबईच्या दिशेने निघाली असता घाट उतरताना तीव्र वळणावर बसचालकाचा ताबा सुटला.


ताबा सुटल्याने बस दरीच्या दिशेने गेली आणि झाडांना धडकून दरीत अडकली. या बसचा वेग जास्त असल्याने पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर जखमी असलेल्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.


दिवाळीच्या सुट्ट्या संपून आजपासून बऱ्याच शाळा आणि ऑफिस सुरु होणार आहेत, त्यामुळे सुट्टीसाठी गावी गेलेल्या आणि कामासाठी परतत असणाऱ्या प्रवाशांचा यात जास्त सहभाग होता. मृतांमध्ये तीन महिन्यांची चिमुकली आणि 15 वर्षांची एक विद्यार्थिनी होती, याच विद्यार्थिनीच्या वडीलांचाही मृतांमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.


 ST Bus Accident | चिपळूण-परळ एसटी बसला भीषण अपघात | पोलादपूर