एक्स्प्लोर

Pune :  पुण्यात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य देणार असून प्रत्येकाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर मग बुस्टर डोसचा विचार करु असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.

पुणे : पुण्यामध्ये जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यावर भर असेल, ज्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य देणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी सांगितलं. प्रत्येकाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर मग बुस्टर डोसचा विचार करु असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

पुण्यातल्या कोरोनाच्या स्थितीवर पालकमंत्री अजित पवारांनी आढाव बैठक घेतली. त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, "पुण्यात सध्या कोरोना दर अडीच टक्के असून मत्यूदर 1.4 टक्के आहे. पुण्यातील लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा पार झाला असून गेल्या महिन्यात 16 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या चार आठवड्यामध्ये पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन शहरात आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा मुबलक होईल हे पाहिलं जात आहे." 

नवीन लोकांना पहिला डोस देण्यापूर्वी ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसरा डोस देऊन लसीकरण पूर्ण करायचं असं ठरवलं आहे. तसचे रुग्णालयाच्या बिलाबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की, "आदर पुनावाला यांच्याशी बोलणं माझं बोलणं झालं नाही पण विभागीय आयुक्तांशी बोलणं झालं आहे. सीरमकडून पुण्यासाठी जास्तीत जास्त डोस उपलब्ध करण्यासंबंधी विचार करत आहोत. गरीब लोकांना, झोपडपट्टीवासियांना मोफत लस देण्याचा निर्णय झाला आहे."

एखाद्याने स्वत:च्या पैशाने बुस्टर डोस घेतला तर त्याला हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

इथून पुढे स्थानिक वृक्षांचे रोपण करा असेच आदेश वनविभागाला दिल्याचं अजित पवारानी सांगितलं. ते म्हणाले की, "फार पूर्वी एक चव्हाण नावाचे मंत्री होते, त्यांनी बाहेरचे काही वृक्ष आणले. यामध्ये सुबाभळ अशी काही झाडे आहेत. यामुळे पक्षी येत नाहीत, ते स्थानिक हवामानाला सूटही होत नाहीत. इतर काही झाडे आहेत ते अपायकारक असल्याने ती झाडे लावणं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates : देशात-महाराष्ट्रात आज काय-काय घडतंय? पाऊस, राजकारण, अपघात ते मोठे निर्णय... प्रत्येक अपडेट LIVE
Maharashtra Breaking Live : देशात-महाराष्ट्रात आज काय-काय घडतंय? पाऊस, राजकारण, अपघात ते मोठे निर्णय... प्रत्येक अपडेट LIVE

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Embed widget