एक्स्प्लोर

पुण्यात सदाशिव पेठेत थरार, तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार, हल्लेखोराने स्वत:लाही संपवलं

रोहित त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत थांबला असता मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात तरुणाने त्याच्यावर अॅसिड टाकलं आणि गोळीबार केला.

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत रात्रीच्या वेळेस थरारनाट्य पाहायला मिळालं. मैत्रिणीशी बोलत थांबलेल्या एका तरुणावर अॅसिड हल्ला आणि गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये रोहित खरात हा तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोराने गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमसंबंधातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची चर्चा आहे. सदाशिव पेठेतील एका गल्लीबोळात मंगळवारी (16 एप्रिल) रात्री हा प्रकार घडला. टिळक रोडवरील बादशाही बोर्डिंग गल्लीमधील स्वप्नगंधा अपार्टमेंटच्या मेनगेट समोर रोहित थोरात आपल्या मैत्रिणीसोबत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोलत थांबला होता. त्यावेळी हल्लेखोर सिद्धराम विजयकुमार कलशेट्टीने मागून येऊन त्याच्यावर अॅसिड टाकत गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर जवळच्याच एका इमारतीच्या गच्चीवर जाऊन लपून बसला होता. अॅसिड हल्ल्यात रोहितच्या चेहऱ्याला आणि पाठीला इजा झाली. त्याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याला गोळी लागलेली नाही. या कृत्यानंतर हल्लेखोराने स्वत:लाही संपवलं. पोलिसांपासून तो लपताना तो गच्चीवरुन इमारतीच्या डक्टवर पडला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढण्याचं आव्हान पोलिस आणि अग्निशमन दलासमोर होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढलं तेव्हा तो मृतावस्थेत होता. VIDEO | पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार हल्लेखोराकडे पिस्तुल असल्याने पोलिस काळजीपूर्वक कारवाई करत होते. रोहितवर हल्ला केल्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली होती. पोलिस आणि अग्निशमन दल त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. डक्टमध्ये पडल्यामुळे तो जखमी झाला होता. सुमारे तासभर तो तिथे अडकला होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर त्याला इमारतीमधून बाहेर काढलं. पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पुण्यात सदाशिव पेठेत थरार, तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार, हल्लेखोराने स्वत:लाही संपवलं पुणे अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपी सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी दरम्यान, हे थरारनाट्य घडताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरात स्पर्धा परीक्षांचे क्लासेस असल्यामुळे अनेक विद्यार्थी या भागात येतात.

महत्त्वाच्या बातम्या

Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget