एक्स्प्लोर

भामरागड येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंढरपूर मधील पुळूजचा सुपूत्र शहीद

भामरागड तालुक्यातील पोरयकोटी-कोरपर्शी जगंलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंढरपूर मधील पुळूजचा सुपूत्र शहीद झाला. तीन महिन्यापूर्वीच त्याचा साखरपुडा गावातील मुलीसोबत झाला होता.

पंढरपूर : एकीकडे पोलीस बांधव कोरोना संकटाविरोधात लढत असताना दुसरीकडे नक्षली कारवायांना उत आला आहे. आज (17 मे 2020) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पोरयकोटी-कोरपर्शी जगंलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि एक सी-60 पथकाचा जवान शहीद झाला आहे. या घटनेत तीन जवान जखमी झाले आहेत. धनाजी होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावचे सुपुत्र आहेत. याची माहिती समजताच पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली. पुळूज या त्यांच्या गावाला धक्का बसला आहे. अतिशय हुशार आणि कर्तबगार अशी ओळख असलेल्या पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हा पुळूजचा सुपुत्र होता. पहिल्यापासून पोलीस दलात जाण्याचे स्वप्न बघितलेल्या धनाजी यांची पोस्टिंग नक्षलवादी भागात झाली होती. दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा गोळीबार आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलीस उपनिरीक्षक धनाजी होममाने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक होममाने हे सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील आहे. विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षल ठार झाला नाही. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रेन पकडण्यासाठी दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन महिलेची धाव; महिला पोहोचेपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबून तीन महिन्यापूर्वी झाला होता साखरपुडा संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे थांबले असताना गडचिरोलीत नक्षल्यांशी मुकाबला करताना दोन विरांनी आहुती दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद धनाजी होनमाने हे शेतकरी कुटुंबातील आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ त्यांची शेती आहे. तीनच महिन्यापूर्वी धनाजींचा साखरपुडा गावातील एका मुलीसोबत झाला होता. धनाजींना एक छोटा भाऊ असून तो उच्च शिक्षण घेत आहे, तर आई-वडील शेती करतात. दरम्यान, काही दिवसांनी धनाजीचा विवाह होता. मात्र, त्याआधीच धनाजीला विरमरण आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. Migrant Workers | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रच्या सीमेवर काय परिस्थिती? स्थलांतरितांच्या काळीज हेलावणाऱ्या कहाण्या

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget