मुंबई : इंधन दरवाढीपाठोपाठ सामान्यांना महागाईचा दुहेरी झटका बसलाय. इंधन दरवाढीने नागरिक हैराण झालेले असताना खाद्यतेल आणि डाळींचे दर वाढलेत. डाळींचे भाव शंभरीवर गेलेत. गेल्या 15 दिवसांत डाळींमागे सरासरी 10 ते 15 रुपयांची वाढ झालीय. तर खाद्य तेल किलोमागे 15 दिवसांत 12 ते 15 रुपयांनी महागलंय.
डाळी आणि किराणा माल :
डाळी आजचा दर मागील दर
तूरडाळ - 110 95
मुगडाळ - 102 90
उडीदडाळ - 220 98
चनाडाळ - 66 55
शेंगदाणा - 120 110
भगर - 102 95
साबुदाणा - 62 55
खाद्यतेल एक किलोचे दर
शेंगदाणा - 17o 155
सूर्यफूल - 152 135
सोयाबिन - 128 115
पामतेल - 110 100
लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादन कमी झाले होते तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती, मागणी वाढली आहे. मात्र उत्पादन कमी आहे, आयातीवरील कर कमी केले सरकारने तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च पण वाढला हे ही एक कारण आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगार, वेतन कपात झालेल्या नागरिकांना आता महागाईचे हे चटके नकोसे झाले आहेत. महागाईवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असाच प्रश्न त्यांना पडला असून लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष घालावे आणि दिलासा द्यावा अशीच मागणी सर्वसामान्य करत आहे
इंधन दरवाढ, आयातीवरील कर आणि कमी उत्पादन या कारणांमुळे किराणा मालाचे भाव वाढल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन होईल या भिती आणि अफवेमुळे तर महागाई भडकली नाही ना ? अशीही शंका आता उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या :