मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढारी वृत्तपत्र आणि एबीपी माझाने महासर्वेक्षण करुन ‘कौल मराठी मनाचा’ जाणून घेतला.

फडणवीस सरकारची कामगिरी कशी सुरु आहे, जनतेचा कल कुठे आहे, सरकारची धोरणं, निर्णय, योजना इ. जनतेला पसंत पडत आहेत का, इत्यादी अनेक प्रश्नी पुढारी वृत्तपत्र आणि एबीपी माझाने जनतेचा कौल जाणून घेतला गेला.

महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?

  • होय – 39 टक्के

  • नाही – 61 टक्के


 सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीसाठी आपण 10 पैकी किती गुण द्याल?

  • 1 ते 3 गुण (सुमार कामगिरी) – 37 टक्के

  • 4 – ते 6 टक्के (चांगली कामगिरी) – 36 टक्के

  • 7 ते 10 गुण (उत्तम कामगिरी) – 27 टक्के


आता निवडणूक झाली, तर तुम्ही कोणत्या पक्षाला मत द्याल?

भाजप – 27 टक्के

  • शहरी महाराष्ट्र – 31 टक्के

  • ग्रामीण महाराष्ट्र – 25 टक्के


राष्ट्रवादी काँग्रेस – 25 टक्के

  • शहरी महाराष्ट्र – 19 टक्के

  • ग्रामीण महाराष्ट्र – 27 टक्के


शिवसेना – 17 टक्के

  • शहरी महाराष्ट्र – 16 टक्के

  • ग्रामीण महाराष्ट्र – 18 टक्के


काँग्रेस – 17 टक्के

  • शहरी महाराष्ट्र – 16 टक्के

  • ग्रामीण महाराष्ट्र – 17 टक्के


अन्य – 14 टक्के

  • शहरी महाराष्ट्र – 18 टक्के

  • ग्रामीण महाराष्ट्र – 13 टक्के


सरकार कोणत्या प्रश्नावर अपयशी ठरले, असे आपणास वाटते?

  • शेतकरी आत्महत्या – 53 टक्के

  • बेरोजगारी – 50 टक्के

  • महिला अत्याचार – 41 टक्के

  • कायदा/सुव्यवस्था – 31 टक्के

  • शिक्षणविषयक धोरण – 29 टक्के

  • सामाजिक सलोखा – 21 टक्के

  • उद्योगांना प्रोत्साहन देण्यात कमतरता – 17 टक्के

  • ई-गव्हर्नन्समधील उणिवा/त्रुटी – 12 टक्के

  • ऑनलाईन सातबारा/दस्त नोंदणीतील अडचणी – 16 टक्के


सरकारचा गेल्या चार वर्षातील कोणता निर्णय अधिक प्रभावी वाटला?

  • जलयुक्त शिवार योजना – 57 टक्के

  • शेतकरी कर्जमाफी – 33 टक्के

  • कौशल्य विकास योजना – 16 टक्के

  • स्टार्ट-अप योजना – 14 टक्के

  • सेवा हमी कायदा – 12 टक्के


आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा असे आपणास वाटते?

  • देवेंद्र फडणवीस – 25 टक्के

  • अजित पवार – 18 टक्के

  • उद्धव ठाकरे – 15 टक्के

  • पृथ्वीराज चव्हाण – 11 टक्के

  • धनंजय मुंडे – 6 टक्के

  • राज ठाकरे – 6 टक्के

  • अशोक चव्हाण – 9 टक्के

  • सुप्रिया सुळे – 5 टक्के

  • पंकजा मुंडे – 5 टक्के


मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याचे काम प्रभावी आहे, असे आपणास वाटते?

  • देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (गृह, नगरविकास, विधी व न्यायमंत्री) – 16 टक्के

  • चंद्रकांत पाटील (महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री) – 16 टक्के

  • सुधीर मुनगंटीवार (अर्थ व नियोजन, वनमंत्री) – 3 टक्के

  • गिरीश महाजन (जलसंपदामंत्री) – 2 टक्के

  • पंकजा मुंडे (महिला व बालविकास आणि ग्रामीण विकासमंत्री) – 12 टक्के

  • रामदास कदम (पर्यावरणमंत्री) – 2 टक्के

  • विनोद तावडे (शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण सांस्कृतिक मंत्री) – 4 टक्के

  • इतर – 25 टक्के

  • कोणीही नाही – 18 टक्के


खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा प्रभाव निवडणुकीवर होईल?

  • शेतकऱ्यांचे प्रश्न – 50 टक्के

  • मराठा मोर्चा – 41 टक्के

  • नोटाबंदी – 38 टक्के

  • जीएसटी – 35 टक्के

  • बँकांतील घोटाळे – 28 टक्के

  • कोरेगाव भीमा प्रकरण – 23 टक्के


 आगामी विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर प्रभावशाली ठरेल का?

  • होय – 25 टक्के

  • नाही – 47 टक्के

  • संगाता येत नाही – 28 टक्के