नागपूर: महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच पोलिस दलानं अनेक वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पानभर जाहिरात देऊन, नक्षल्यांची माहिती देणाऱ्यांना लाखोंचं इनाम जाहीर केलं.
पाच टॉप नक्षल्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण एक कोटी 71 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
यामध्ये मनोजा वेणूगोपाल उर्फ भूपती, दीपक मुलिंग उर्फ सह्याद्री तेलतुंबडे, नर्मदाअक्का, जोगण्णा उर्फ घिसू आणि पहाडसिंग उर्फ टिपू सुलतान यांचा समावेश आहे.
नक्षलवाद्यांचा कणा
बुद्धी, पैसा, नियोजन आणि शस्त्र याची जबाबदारी याच पाच जणांवर असते. गडचिरोलीच्या नक्षलवादी चळवळीचे जणू हे पाच खांबच आहेत. याच खांबांना नेस्तनाबूत केले, तर चळवळीचा कणाच मोडेल असा विश्वास सुरक्षा यंत्रणांना आहे. पण या 5 जणांची दहशत पाहून त्यांची माहिती द्यायला कोण पुढे येणार हे पाहावे लागेल.
नक्षलवाद्यांची धमकी
तर तिकडे पोलिसांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून नक्षल्यांनी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गडचिरोलीच्या भामरागड-पेरमिली मार्गावरील आलदण्डी गावाजवळ नक्षलवाद्यांनी धमकीचे बॅनर लावले आहेत.
22 एप्रिलनंतर सलग दोन ते तीन दिवस पोलिसांनी नक्षल्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. त्यात एकूण 40 नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते.
या नक्षलवाद्यांची माहिती द्या, लाखोंचं बक्षीस मिळवा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 May 2018 04:22 PM (IST)
पाच टॉप नक्षल्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण एक कोटी 71 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -