बीड : बीड बसस्थानकासमोर आपल्या आईची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अब्दुल रहेमान उर्फ एरार असं या माथेफिरुचं नाव असून त्याने मुलीचा विनयभंग करुन तिला मारहाण केली आहे.


बसस्थानकासमोरील खाजगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाजवळ ही तरुणी पुण्याहून येणाऱ्या आपल्या आईची वाट पाहत होती. यावेळी अब्दुलने तिचा विनयभंग करत तिला मारहाण केली. घाबरलेल्या मुलीने धावतपळत जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं. पण तिथेही या माथेफिरुने तिचा पाठलाग करणं सोडलं नाही.

दरम्यान मुख्यालयातील पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर कत्तीने वार करुन त्याला जखमी केलं. सकाळची वेळ असल्याने कार्यालयात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी अब्दुल रहेमान उर्फ एरार याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.