एक्स्प्लोर
उस्मानाबादमध्ये PSI चा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उस्मानाबाद : रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. पीडित मुलगी अकरावी इयत्तेत शिकते. तर प्रेम बनसोडे असं या 26 वर्षीय आरोपी पीएसआयचं नाव आहे. आनंदनगर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पीएसआय प्रेम बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ उस्मानाबादचा रहिवाशी असलेला पीएसआय बनसोडे हा सध्या सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कारप्रकरणी गुन्हा नोंदवू नये, म्हणून पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकावलं. दरम्यान, आरोपी पीएसआय प्रेम बनसोडे याला तात्काळ अटक करण्यात आले आहे.
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















